तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
मनाने मनावर केलेलं प्रेम....की नजरेचं सौंदर्यावर असलेलं प्रेम हे प्रेम असतं ?
खर पाहता प्रत्येक जण प्रेमात,
ह्या दोन्ही गोष्टींना महत्व देत असतो ।
प्रत्येकाच्या दृष्टीने फक्त...
दिलेल्या'इम्पॉर्टन्स'च्या'पर्सेंटेज'मध्ये थोडासा फरक असतो ।
तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
आईने-मुलावर,नवर्याने-बायकोवर,मित्राने-मैत्रिणीवर केलेलं प्रेम....की माणसाने माणसावर केलेलं प्रेम हे प्रेम असतं ?
खर पाहता प्रेमात नात्याला फारसं महत्व नसतं ।
कारण प्रेमाच्या ओलाव्याने नातं फुलत असतं...
पण नातं असल्याने त्यात प्रेमाचा ओलावा असतोच असं काही नसतं ।
तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?
एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्याने,अथवा तिची जागा दुसर्या कुणीतरी घेतल्याने..
तिच्यावर असलेल प्रेम का कमी होत असतं ?
माझ्यामते तरी तिच्या असण्याने वा नसण्याने,
असलेलं प्रेम कमी-जास्त होत नसतं ।
प्रेम असेल जर का तिच्यावर मनापासून तर...
तिच्या नसण्यातही असण्याचा आभास ते निर्माण करत असतं ।
तुझ्या मते सांग मला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?....
हर्षद अ. प्रभुदेसाई.....
छान ..चांगली लिहिली आहे..!!
उत्तर द्याहटवाNice Mitraa,
उत्तर द्याहटवाShevatchi dhon khadwi jhakaas vaatli.
Ashya chan chan kavita karat raah.
kharech khup chan Ahe mitra prem ya don syebdaana kiti mothe waky Ahe prem prem love pyaar isq
उत्तर द्याहटवाnice
उत्तर द्याहटवाkhup chan
उत्तर द्याहटवा